Democracy Talks (लोकशाही गप्पा)


लोकशाही गप्पा (भाग १)


५ सप्टेंबर २०२१ - शिक्षक दिन

स्थळ : पुणे विद्यापीठ, पुणे

अन्य देशांच्या तुलनेत भारतातील लोकशाही, त्याच्या मर्यादा, राजकारण, राजकारणात महिलांचे स्थान, मतदानात ‘नोटा’चा अधिकार, अशा सर्व विषयांवर दिलखुलासपणे चर्चा ‘लोकशाही गप्पा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली. मतदारांमध्ये निवडणूक आणि लोकशाहीविषयी जागृती निर्माण करण्यासाठी प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात लोकशाही गप्पांचे आयोजन केले होते. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुहास पळशीकर, अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे, श्रीरंग गोडबोले, प्रवीण महाजन, रवींद्र धनक, राही श्रुती गणेश आदी मान्यवरांसोबत या वेळी विद्यार्थ्यांनी चर्चा केली. सूत्रसंचालन डॉ. दीपक पवार यांनी केले.


लोकशाही गप्पा (भाग २) - लोकशाही आणि माध्यमांची भूमिका


२९ ऑक्टोबर २०२१

सह्याद्री अतिथीगृह, मुंबई

सहभाग - श्रीकांत बोजेवार (महाराष्ट्र टाइम्स), जयश्री खाडिलकर (नवाकाळ), निलेश खरे (झी चोवीस तास) विनायक पात्रुडकर (लोकमत), दिलीप पांढरपट्टे (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय), प्रसन्न जोशी(साम टीव्ही), साहिल जोशी ( आज तक), संवादक : डॉ. दीपक पवार (निमंत्रित सल्लागार, स्वीप), निमंत्रक : श्रीकांत देशपांडे (प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य), मंदार पारकर (अध्यक्ष, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघ)


लोकशाही गप्पा (भाग-३) - कशी होते मतदार नोंदणी?


१० नोव्हेंबर २०२१

ऑनलाइन परिसंवाद

मतदार नोंदणीचा अर्ज दाखल केल्यानंतर काय कार्यवाही होते? मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण म्हणजे काय? सहभागी वक्ते : श्री. श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र), श्री. राजीव निवतकर (जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर), श्रीमती मृणालिनी सावंत (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे), श्री. मंदार वैद्य (मतदार नोंदणी अधिकारी, औरंगाबाद), श्री. पराग मुळे (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, औरंगाबाद), संवादक : श्रीमती अलका धुपकर (साहाय्यक संपादक, टाईम्स इंटरनेट, मुंबई), श्री. राज असरोंडकर (संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ, मुंबई), प्रस्तावना व आभार : श्री. दिलीप शिंदे (स्वीप सल्लागार)


लोकशाही गप्पा (भाग-४) - लेखक, भाषा आणि लोकशाही


४ डिसेंबर २०२१

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित - लेखक, भाषा आणि लोकशाही. सहभाग : दिनकर गांगल (ज्येष्ठ संपादक), दीप्ती राऊत (पत्रकार), इब्राहीम अफगाण (पत्रकार), कौतिकराव ठाले पाटील (अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ), रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ (लेखक, संपादक), श्रीकांत देशपांडे (प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र) । संवादक : डॉ. दीपक पवार (प्राध्यापक, राज्यशास्त्र)


लोकशाही गप्पा (भाग-५) : स्त्रिया आणि लोकशाही परिसंवाद


८ मार्च २०२२

जे.एस.एम. महाविद्यालय,अलिबाग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रायगड

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित


लोकशाही गप्पा (भाग -६) - 'लेखक आणि लोकशाही मूल्ये'


२२ एप्रिल २०२२

उपमंडप २, नथमलशेठ इन्नाणी सभागृह, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित